Search Articles
See All Tags

HyperLink




योग - अध्यात्म

12
गेल्या रविवारची गुरूपौर्णिमा - काही गोष्टी
गेल्या रविवारी म्हणजे 25 तारखेला गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने माझ्याकडून ध्यानधारणा शिकलेले अनेक जण भेटून गेले. काहींनी अपरिहार्य कारणामुळे येण्याची इच्छा असूनही येणे शक्य झाले नाही असे आवर्जून कळवले. दिवसभर कोण ना कोण येतच होते. त्यांच्याशी बोलताना अनेक विषय निघत होते, प्रश्नोत्तरे होत होती. त्यातूनच निवडलेले काही महत्वाचे मुद्दे जे सर्वच साधकांना उपयोगी पडू शकतील ते येथे देत आहे. ही नोंद काहीशी विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे कारण हे सगळे मुद्दे वेगवेगळ्या साधकांशी झालेल्या बोलण्यातून काढलेले आहेत.
Posted On : 01 Aug 2010
शिवलिंग पूजनाचा खरा अर्थ
शिवलिंग पूजनाकडे वळण्याआगोदर प्रथम शिवलिंग कसे असावे ते माहित असणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारची शिवलिंगे उपलब्ध असतात. साधारणतः संगमरवर, पितळ, पंचधातू, स्फटिक, पारद, काच यांचे बनलेले शिवलिंग वापरतात. जर आर्थिकदृष्य़ा शक्य असेल तर पारद वा स्फटिक शिवलिंग जरूर खरेदी करावे. पारद आणि स्फटिक शिवलिंग आर्थिक भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी चांगली मानली जातात. त्यातही पारद शिवलिंग जास्त लोकप्रिय आहे. पारद शिवलिंग लोकप्रिय असण्याचे अजुन एक कारण म्हणजे पारा हा शंकराचे वीर्य असल्याचे मानले जाते. त्यामागील कथा थोडक्यात अशी...
Posted On : 21 Jul 2010
कच्च मडकं
एकदा एक साधक एका सदगुरूंकडे गेला. गुरूजींनी आपल्याला शिष्य म्हणून स्विकारावे म्हणून स्वतःच आपली वारेमाप स्तुती करू लागला. आपणच पात्र शिष्य कसे आहोत, अध्यात्माविषयी आपल्याला किती प्रचंड ओढ आहे, आपले वाचन आणि पुस्तकी पांडित्य कसे तगडे आहे, गुरूंकडून दीक्षा घेण्याची योग्य वेळ कशी आली आहे. अशा एक ना अनेक गोष्टी फुगवून फुगवून तो सांगू लागला.
Posted On : 30 Jun 2010
योगाभ्यासाला पोषक गोष्टी
लेखमालेच्या मागील भागात आपण योगाभ्यासाची हानी कोणत्या गोष्टींनी होते ते पाहिले. या भागांत आपण योगाभ्यासाचे पोषण कोणत्या गोष्टींनी होते ते पाहणार आहोत. या गोष्टी योगाभ्यासासाठी 'टॉनिक'चे काम करतात. त्यामुळे योगाभ्यास जोमाने करता येतो. परिणामी इच्छित ध्येयापर्यंत लवकर पोहोचता येते. स्वात्मारामाच्या मते उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय, जनसंग परित्याग या सहा गोष्टी योगाभ्यासात यश देणार्‍या आहेत.
Posted On : 06 Jan 2010
योगाभ्यासाला हानीकारक गोष्टी
सामान्यतः साधकांची अशी एक समजूत असते की योगाभ्यास म्हणजे सकाळ-संध्याकाळ तास दोन तास काही शारीरिक वा मानसिक क्रिया करणे. ही समजूत साफ चुकीची आहे. योग ही एक जीवनशैली आहे. काही काळ केली जाणारी साधना हा तीचा केवळ एक छोटा भाग आहे. साधकांची नेहमी एक तक्रार असते की अनेक वर्षे साधना करून सुद्धा काहीच फायदा झाला नाही. या तक्रारीचे मुळ बर्‍याचदा त्यांच्या जीवनशैलीत दडलेले असते. येथे स्वात्माराम असे काही घटक सांगत आहे जे साधकाने आपल्या आयुष्यातून हद्दपार केले पाहिजेत.
Posted On : 01 Jan 2010
नववर्षाच्या निमीत्ताने...
जुन्या वर्षाची संध्याकाळ दृष्टीपथात आहे. लवकरच जुने वर्ष इतिहासाच्या अंधारात गुडूप होईल आणि अजून एक नवे वर्ष आशा-आकांक्षांच्या सूर्यप्रकाशात न्हावून आपल्यापुढे हजर होईल. खरंतर वर्षामागून वर्षे येत असतात आणि जात असतात. आपण त्यांच स्वागत केल नाही तरी.
Posted On : 23 Dec 2009
योगाभ्यासाला उपयुक्त जागा
स्वात्मारामाने येथे योग्याने कशा प्रकारच्या कुटीत अभ्यास करावा ते सांगितले आहे. वरील वर्णन वाचून तुम्हाला कदाचित असे वाटेल की ते जुन्या काळालाच लागू आहे. आजच्या आधुनिक सिंमेंटकॉंक्रिटच्या काळात हे वर्णन कालबाह्य आहे. पण या वर्णनाचा गाभा लक्षात घेतल्यास आजच्या योग्यालाही हे घटक गरजेचे आहेत आणि थोड्याशा प्रयत्नाने ते अंमलात आणणेही शक्य आहे.
Posted On : 11 Dec 2009
हठविद्येच्या गोपनीयतेची आवश्यकता
स्वात्मारामाने येथे एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे. विशेषतः नवीन साधकांसाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. हठविद्या गोपनीय राखली तरच ती फलप्रद होते. अन्यथा ती निष्फळ ठरते असे स्वात्मारामाचे सांगणे आहे. आधुनिक विचारसरणीचे साधक अनेकदा अशा गोपनीयतेला विरोध करताना आढळतात. पण त्यातील खरे मर्म समजून घेतले पाहिजे.
Posted On : 04 Dec 2009
नाथ संप्रदाय आणि नाथ सिद्ध
स्वात्माराम आता आपल्याला हठयोग कसा माहित झाला ते सांगत आहे. प्रथम मत्स्येन्द्रनाथांना तो ज्ञात झाला आणि त्यांनी मग तो गोरक्षनाथांना दिला. गुरूपरंपरेने तो स्वात्मारामाला प्राप्त झाला. मत्स्येन्द्रनाथांना हठविद्या कशी प्राप्त झाली त्याची एक सुरस कथा आहे. ती अशी...
Posted On : 23 Nov 2009
हठयोगाचे प्रयोजन
हठयोग या विषयावर लोकांमधे अनेक गैरसमज आहेत. हठयोगी हा शरीरावरच फार प्रेम करतो. त्याचे सारे लक्ष शरीराची काळजी घेणे, नाना सिद्धी मिळवणे, चमत्कार करणे, कठीण कठीण आसने करणे यांकडे असते असे एक ना अनेक गैरसमज लोकांमधे असतात. केवळ काही पाखंडी, वाट चुकलेल्या हठयोग्यांकडे बोटे दाखवून ते सार्‍या हठयोगशास्त्रालाच नावे ठेवत असतात.
Posted On : 13 Nov 2009
12
Latest Articles
Using the Wizard control of ASP.NET
Using Site Maps to provide web site navigation
Using Extension Methods
Working with Binary Large Objects (BLOBs) Using SQL Server and ADO.NET
Using LINQ in ASP.NET (Part 4)
Tip: Fetching Random Rows From SQL Server
Using LINQ in ASP.NET (Part 3)
Using LINQ in ASP.NET (Part 2)
Using LINQ in ASP.NET (Part 1)
Getting Started with IIS7 (Part 2)
 
Copyright (C) BinaryIntellect Consulting. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web