|
|
योगारूढ |
|
आज ‘देवाच्या डाव्या हाती’ चा हे शेवटचे प्रकरण लिहिताना काय लिहावे हे सुचतच नाहीये. गेल्या अनेक वर्षांचा काळ एखाद्या चलचित्रासारखा डोळ्यांसमोरून सरकतोय. अनेक नव्या-जुन्या आठवणींनी मनात दाटी केलेय. सांगण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत, पण सगळ्याच सांगत बसलो तर बराच वेळ जाईल. तेव्हा कोठेतरी थांबायलाच हवे. प्रत्येक साधकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तो केवळ योग साधक न रहाता योगी बनतो. माझ्याही आयुष्यात ती वेळ योग्य काळी आली. ही योगारूढ अवस्था शब्दांत पकडता यायची नाही. केवळ अनुभवातूनच ती कळू शकते. त्यामुळे त्याविषयी येथे फार काही लिहीता येणार नाही. |
|
Posted On : 06 Jun 2009 |
|
|
क़र्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम |
|
नोकरी शोधायला सुरवात केली खरी, पण मी जरा काळजीतच होतो. IT industry अशी आहे की तेथे क्षणाक्षणाला नवे बदल होत असतात. माझे skill set भक्कम असले तरी ते थोडे घासून पुसून काढणे गरजेचे होते. इंटरव्यूची तयारीही करायला हवी होती. पण सुदैवाने थोड्याच अवधीत मला नोकरी मिळाली. एवढ्या लवकर नोकरी मिळाल्याने हायसे वाटले. |
|
Posted On : 05 Jun 2009 |
|
|
अद्भुत स्वप्न आणि दीक्षा |
|
एका विशाल पर्वताचा चढ मी चढत होतो. सर्वत्र एक विलक्षण शुभ्र चांदणे पडल्यासारखा आल्हाददायक प्रकाश पडला होता. जाता जाता योगी, साधू, संन्यासी, बैरागी व तांत्रिकांचे जथेच्या जथे मला दिसत होते. कोणी चित्रविचित्र आसने करत होते तर कोणी तंत्र-मंत्रात गर्क होते. कोणी उग्र तपाचरणात मग्न होते तर कोणी भव्य यज्ञ उभारत होते. ते कोण आहेत काहीच कळत नव्हते. सर्वजण आपापल्या कार्यात व्यग्र होते. कोणालाही माझ्याकडे लक्ष देण्यास सवड नव्हती. करता करता चढ संपला. एक अद्भुत दृश्य समोर दिसत होते. श्रीशंकर गिरिजेसह विराजमान झाले होते. मघाचा तो प्रकाश त्या उभयतांच्या मुखमंडलामधूनच प्रकट होत होता. मला आनंदाचे भरते आले. मी त्यांना वारंवार नमस्कार करू लागलो. तोंडाने स्तुतीपर वचने बोलू लागलो. काही काळाने आनंदाचा भर ओसरल्यावर काय करावे हे न सुचून त्यांच्या पायाशी तसाच स्वस्थ बसून राहिलो. |
|
Posted On : 04 Jun 2009 |
|
|
कुंडलिनी जागृती |
|
करता करता रांग संपली. पुजारी पूजा करण्यात, फुले-धूप सारखे करण्यात मग्न होते. त्र्यंबकेश्वरचे शिवलिंग सामान्य शिवलिंगांपेक्षा वेगळे आहे. ते खोलगट असून त्यात तीन अंगठ्याएवढे उंचवटे (लिंगे) आहेत. ते ब्रम्हा, विष्णू, महेश ही त्रिमूर्ती आहेत असे मानले जाते. गर्दी कमी असल्याने डोळे भरून दर्शन घेता आले. या मंदिरात दर्शनासाठी काही विशिष्ट दिवसांखेरीज गाभार्यात जाऊ देत नाहीत. तेव्हा बाहेरूनच गाभार्याच्या उंबरठयावर डोके ठेवले. एक क्षण शंकराची सर्वांगसुंदर मूर्ती डोळ्यांसमोर तरळली. दुसर्याच क्षणी एक प्रचंड विजेचा लोळ माझ्या पाठीतून डोक्याकडे उठला. त्या अनपेक्षित धक्क्याने मी जवळजवळ कोलमडलोच. |
|
Posted On : 03 Jun 2009 |
|
|
गुरुचा शोध |
|
शेवटी एक दिवस निर्णय घेतला की हे 'गुरू शोधन' बंद करायचे व स्वत:च काही निवडक साधना सूरु करायच्या. गुरू शिवाय हा मार्ग कठीण आहे ह्याची कल्पना होती पण 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' हे पटत नव्हते. योग्य गुरू मिळेपर्यंत तरी आपली आपण साधना करावी असा निश्चय केला. एका शुभ दिवशी पहाटे लवकर उठलो. स्नान करून इष्ट देवतेची व ज्ञानेश्वरीची पूजा केली. त्यानंतर ज्ञानेश्वरीला गुरू ग्रंथ मानून कुंडलिनी योग साधनेची शपथ घेतली. |
|
Posted On : 02 Jun 2009 |
|
|
नवी साधना व उत्स्फूर्त क्रिया |
|
घरी परत आल्यावर आता साधना पूर्वीसारखी सुरू करायला हवी होती. साधनेला बसल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, आजवर उत्साहाने केलेली साधना एकदम कंटाळवाणी वाटू लागली. एकाही साधनेत मन लागेना. केवळ सवय म्हणून साधना केली पण त्यात काही जीव नव्हता. असे का होतेय ते कळेना. मनात सहजप्रेरणा होऊ लागली की आता पूर्वीच्या साधना संपल्या. त्या आता काहीच उपयोगी नाहीत. अगदी तासनतास केल्या तरी आता त्यांतून काहीच फायदा होणार नाही. पूर्वीच्या साधना करायच्या नाहीत तर मग काय करायचे ते मात्र कळत नव्हते. बराच प्रयत्न केल्यावर कंटाळा आला. शवासन करून साधना संपवू या असे म्हणून चटई टाकली. |
|
Posted On : 01 Jun 2009 |
|
|
साधक प्रश्नावली |
|
कुंडलिनीविषयी साधकांमधे एवढे गैरसमज असतात की त्या जंजाळामधे कुंडलिनीचे खरे स्वरूप त्यांना कळतच नाही. अनेक पुस्तकांमधे लेखक प्राचीन योगग्रंथांमधले कुंडलिनी आणि चक्रांचे वर्णन घोळवून घोळवून सांगत बसतात. प्राचीन ग्रंथ हे योग्यांसाठी प्रमाण आहेत हे खरे, पण तुमच्या स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नवशिक्या साधकांसाठी समजेल अशा भाषेत हे गूढ उकलायला नको का? असो. |
|
Posted On : 01 Jun 2009 |
|
|
पुस्तक वाचण्यापूर्वी... |
|
काही वर्षांपूर्वी माझे 'Kundalini Yoga: Concepts & Practices’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर अनेक वाचकांची पत्रे व Emails आल्या. त्यात बरेच प्रश्न, शंका, गोंधळ आणि गैरसमज होते. कुंडलिनी जागृतीचे अनुभव जाणून घेण्याची अनेकांची इच्छा होती. हे छोटेखानी पुस्तक त्याचीच परिणती आहे. नवखा साधक ते योगी या मार्गावर बरेच अनुभव आले. ते सर्वच येथे मांडणे शक्य नाही. तसा विचारही नाही. |
|
Posted On : 01 Jun 2009 |
|
|
मी परत येतो |
|
एका दिवसात आयुष्य केवढे बदलून गेले होते. असे वाटत होते की अनेक वर्षांचा काळ लोटला आहे. आताच्या स्वप्नानंतर तर आजवर योगशास्त्रासंबंधी असलेल्या अनेक कल्पना पार पुसल्या गेल्या होत्या. मी आताच्या अनुभवाला स्वप्न असे म्हणत होतो, कारण आधुनिक विज्ञानाकडे त्याला काही स्पष्टीकरण नव्हते. माझ्यासाठी तो प्रत्यक्ष अनुभवच होता. मनात विचार आला - मी परत गेल्यावर लोक यावर विश्वास ठेवतील? मनानेच उत्तर दिले - लोकांना काय वाटते ते फारसे महत्वाचे नाहीये. एक गोष्ट आठवली व हसू आले... |
|
Posted On : 01 Jun 2009 |
|
|
एक विचित्र घटना |
|
फलाटाच्या दुसर्या टोकाला एक म्हातारा फेरीवाला जुनी-नवी पुस्तके मांडून बसला होता. पुस्तकांच्या त्या पसार्याकडे माझे पाय नकळत वळू लागले. एक सुप्त आकर्षण मला लोहचुंबकासारखे खेचत होते. एखाद्य़ा कठपुतळीच्या बाहूलीसारखा मी हलत होतो. मन जणू काही सुन्न, जडवत झाले होते. जणू माझे स्वतंत्र अस्तित्वच कोणीतरी हिरावून घेतले होते. कोणत्याशा एका मातकट पुस्तकाकडे मी यंत्रवत बोट दाखवले. त्या म्हातार्या विक्रेत्याने आनंदाने ते पिशवीत कोंबले आणि माझ्या हाती ठेवले. मी खिशातून हाताला येतील ते पैसे त्याच्या हातावर ठेवले आणि उरलेले पैसेही न घेता चालू लागलो. |
|
Posted On : 01 Jun 2009 |
|
|